सुकामेवा

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

अथ लेखानाराम्भः

Please visit http://sukameva.wordpress.com

I have moved my blog there!!!
नमस्कार मंडळी! श्री गणेशाला स्मरून हा ब्लॉग प्रपंच थाटत आहे. रोज काहीतरी लिहावे हि इच्छा! बघूया कास काय जमतंय ते. खरं म्हणजे मराठी लिहिण्याची खाज माझी लहान पणापासून. पण नोकरी लागल्या पासून इंग्राजीच जास्ती जवळची झाली आणि संगणकामुळे लेखणी हातात धरायची सवयच मोडली. आश्चर्य वाटतं, पण सध्या सही करण्यापुरती काय ती लेखणी हातात धरली जाते. जरा चार ओळी हाताने लिहाव्या तर चक्कं हातदुखतो! पण ह्या गूगल ने मराठी सोप्या प्रकारे लिहिण्याची छान सोय केली. संगणकावर मराठी वाचायला कसंमस्त वाटतं !

आता थोडे ह्या ब्लॉगच्या नवा बद्दल. खरतरं योग्य नाव तसं काही सुचत नव्हता. तेव्हा पत्नीने सुचवले. सुकामेवा अशासाठी की ब्लॉगचा असा विशिष्ट विषय नाही. म्हणजे विषयाची सरमिसळ. पण सरमिसळ पेक्षा सुकामेवा हे शीर्षक आवडले कारण कि सध्या व्यायाम आणि वजन कमी करणे ह्याचे खूळ आमच्या डोक्यात! त्यामुळे, मिसळपेक्षा जास्ती आरोग्यकारक म्हणून सुकामेवा! बाकी पुलं म्हणतात त्याप्रमाणे नावात काय आहे म्हणा! त्यांच्यात शब्दात, "नाव शिवाजी राजेभोसले आणि चालवणार पिठाची गिरणी!" असो. हा सुकामेवा खवट न निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हा सुकामेवा जर आपणास पसंत पडला तर जरूर प्रतिक्रिया कळवा. सूचना असतील तरी कळवा. आता मी मुळचा मुंबईकर पुण्यात राहत असल्यामुळे सूचना ऐकण्याची चांगली सवय झाली आहे ! देणाऱ्याने सूचना द्याव्यात, घेणाऱ्याने स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीप्रमाणे ठरवावे की सूचना स्वीकारायच्या कि नाही ते. काय? बरोबर ना?

चला लिहिण्यास सुरुवात तर झाली. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच.

वाचक